“माझा मराठाचि बोलू कौतुके |
परि अमृतातेहि पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके | मेळविन |”
–संत ज्ञानेश्वर
भाषा ही कोणत्याही मानवी सामाजिक जीवनाचा आधार आहे. ते परस्पर संवादाचे जसे प्रभावी माध्यम आहे तसेच ते ज्ञानसंचय, ज्ञानप्रदानाचे महत्त्वाचे माध्यम आहे. संस्कृती, इतिहास, राष्ट्र, सम्यता, आचार-विचाराचे महत्त्वाचे साधन म्हणून भाषेकडे पाहिले जाते. भारतीय खंडप्राय देशात राज्यघटनेच्या कलमा नुसार प्रांतनिहाय २२ भाषा त्या त्या राज्याच्या राजभाषा म्हणून स्विकारल्या आहेत त्या भाषांपैकीच मराठी हि महाराष्ट्राची राजभाषा आहे. महाराष्ट्राची ती मातृभाषा आहे; तर भारतीय अभिजात भाषांपैकी चौथी भाषा मराठी आहे.
मराठी भाषेला साधारणतः लिखित साहित्याचा बाराशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. महाराष्ट्रात आणि जगात पंधरा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. प्राचिन कालखंडापासून अतिशय दर्जेदार साहित्याची निर्मिती मराठी भाषेतून झाली आहे. ज्ञानेश्वर-लीळाचरित्र, तुकारामांची-गाथा, नामदेवांची-अभंगवाणी, बखर, पोवाडे ही प्राचीन मराठी भाषेची खरी ओळख असून त्यांची ख्याती सातासामुद्रांपलीकडे पोहचली असून यांचा अनेक भाषांत अनुवादही झाला आहे. आधुनिक युगात निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक व ललित गद्य तसेच दलित, ग्रामीण, स्त्रीवादी आणि आदिवासी साहित्यातून देशभर आणि जगभर मराठीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. मराठी दलित साहित्य हे भारतीय दलित साहित्याला प्रेरणादायी ठरले आहे. समाजातील दीन, दलित, वंचित, उपेक्षित घटकांच्या मनोव्यथेचा पहिला हुंकार मराठी साहित्यातूनच उमटला. अभिजनांच्या साहित्य जाणिवांपेक्षा बहुजनांच्या जीवन वेदनेला स्थान देणारे मराठी साहित्यच आहे.
शिक्षणाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे साधन असुशकत नाही; म्हणूनच महाराष्ट्रात उच्चशिक्षण मराठी भाषेतून दिले जाते. मराठी ही मुळात श्रमिकांची, कष्टक-यांची भाषा आहे. या सामान्यांच्या भाषेत अकराव्या शतकापासून संतानी सातत्याने ज्ञानाची क्रांती केली आहे. मराठीतील लोकवाङ्मय व लोकसंस्कृतीच्या खुणा मराठीतून विविधतेने नटलेल्या दिसतात.
जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषा नवनव्या आव्हानांना सामोरी जाऊन कधी त्यात सामावून तर कधी सामर्थ्याने अनेक क्षेत्रात प्रभावीपणे पदार्पण करताना दिसते आहे. या भाषिक संक्रमणाच्या युगातही मराठीने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे. कला, संस्कृती, क्रीडा, न्यायालयीन व वैधक कामकाज, गणित, विज्ञान, उपयोजीत मराठी, संगणक, वृतपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, मोबाईल इत्यादी अनेक क्षेत्रांत मराठी भाषा आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. या नव्या क्षेत्राची परिभाषा मराठीने आत्मसात केली आहे. या पुढेही मराठी भाषेला नव्या नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सजग रहावे लागणार आहे.
महाविद्यालयात मराठी विभागाची स्थापना महाविद्यालयाच्या स्थापणे बरोबरच जून १९९३ साली झाली आहे. विभागात दोन पूर्णवेळ प्राध्यापक कार्यरत असून प्रा.डॉ. जाधव जयद्रथ हे विभाग प्रमुख म्हणून तर प्रा.डॉ शेरखाने चंद्रकांत हे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
पदवी स्तरावर मराठी हा विषय द्वितीय भाषा व ऐच्छिक भाषाविषय म्हणून शिकविला जातो. महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थी मराठी भाषेची द्वितीय भाषा म्हणून निवड करतात. तसेच कला शाखेतील विद्यार्थी ऐच्छिक भाषाविषय म्हणून निवड करतात.
अध्ययन अध्यापनाबरोबर मराठी विभाग व इतर भाषाविभागाच्या वतीने भाषाअभ्यास मंडळाची स्थापना दर वर्षी केली जाते. या द्वारे वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यर्थ्यांमध्ये भाषिक अभिरूची निर्माण व्हावी म्हणून ‘अंकुर’ नावाचे भित्तीपत्रक चालविले जाते. कथा, कविता, वैचारिक, निबंध आदी प्रकारातून विद्यार्थी आपल्या सृजनशीलतेला या भित्तीपत्रकातून वाव करून देतात.
“आम्हां घरी धन | शब्दांचिच रत्ने
शब्दांचिच शस्त्रे | यत्ने करु
शब्देचि आमुच्या | जीवाचे जीवन
शब्दे वाटू धन | जनलोकां”
-संत तुकाराम
अ.क्र. | Photo | प्राध्यापकांचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद | अनुभव | Biodata |
१. | प्रा.डॉ जाधव जे.एस. | एम.ए.,बी.एड., पीएच.डी. | प्राध्यापक आणि विभाग प्रमुख | 24वर्षे
|
Biodata | |
२. | प्रा.डॉ.शेरखाने सी.जे. | एम.ए., पीएच.डी. | सहायक प्राध्यापक | 24वर्षे
|
Biodata |
Departmental Activities